मला वाटलेलं विरोधी बाकावर बसल्यावर वेळ मिळेल, पण कसलं काय?, अजित पवारांनी वास्तव सांगतलं

मला वाटलेलं विरोधी बाकावर बसल्यावर वेळ मिळेल, पण कसलं काय?, अजित पवारांनी वास्तव सांगतलं

| Updated on: Sep 30, 2022 | 1:55 PM

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांचा खास शैलीत विरोधी बाकावर बसल्यानंतरचा किस्सा सांगितला आहे. पाहा...

अश्विनी सातव डोके, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे :  राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचा खास शैलीत विरोधी बाकावर बसल्यानंतरचा किस्सा सांगितला आहे. मला वाटलं होतं विरोधी पक्षनेते पद आल्यावर जरा वेळ मिळेल. पण कसंल काय?उलट विरोध पक्षनेता झाल्यावर अजिबात वेळ मिळत नाही. राज्यात कुठं काही झालं की ताबडतोब बघावं लागतं, असं अजित पवार म्हणालेत.