'2019 ला मोदींची लाट असूनही त्यांचा विजय झाला', अजित पवारांकडून बाळू धानोरकरांच्या आठवणींना उजाळा

‘2019 ला मोदींची लाट असूनही त्यांचा विजय झाला’, अजित पवारांकडून बाळू धानोरकरांच्या आठवणींना उजाळा

| Updated on: May 30, 2023 | 1:08 PM

VIDEO | बाळू धानोरकरा यांचं जाणं धक्कादायक, अजित पवार यांनी व्यक्त केल्या भावना

मुंबई : चंद्रपुरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचं वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या जाण्यानं राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील त्यांना भावपूर्ण श्रद्घांजली वाहिली आहे. ते म्हणाले, चंद्रपुरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचं वय अतिशय तरूण होतं. त्यामुळे त्यांचं जाणं हे धक्कादायक होतं. ते आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही. ते खासदार झाल्यानंतरच माझी ओळख झाली. त्यापूर्वी आमची भेट झालेली. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाने बाळू धानोरकर यांनी तिकीट दिलं आणि २०१९ मध्ये जबरदस्त मोदींची लाट असतानाही ते निवडून आले. त्यांच्या प्रयत्नामुळे ती एक जागा निवडणून आली. पाठपुरावा करण्यास कणखर त्यांचं नेतृत्व होतं. जनतेशी नाळ जोडलेले नेते म्हणून बाळू धानोरकर यांची ओळख होती. असेही पवार म्हणत असताना बाळू धानोरकरांच्या जाण्याचं दुःख व्यक्त करत अजित पवार यांनी त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

Published on: May 30, 2023 01:08 PM