फुटकळ लोकं काहीही म्हणतील, त्यांना उत्तर द्यायला बांधील नाही; अजिप पवार यांचा रोख कुणावर?
VIDEO | भाजप नेत्यानं शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांवर अजित पवार आक्रमक, म्हणाले...
पुणे : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा राजकारण करू नये. तुम्हाला अहिल्यादेवी ची जयंती म्हणजे काय राजकारणाचा अड्डा वाटतो का? जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण केल्यास त्याचा पश्चाताप आजोबांना व नातवाला होईल, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोलापुरात केली या ठीके ला प्रत्युत्तर देत विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेत त्यांच्यावर हल्लाबोल केला. पवार कुटुंब राज्यात कधीचं काम करतंय. चार वेळा मुख्यमंत्री, कृषीमंत्री यासारखी अनेक मोठी पदं त्यांनी सांभाळली. शरद पवार यांचं नाव घेतलं की अलिकडे प्रसिद्धी मिळते. असे म्हणत कोण नाव घेत. त्यांची राजकारणातील उंची किती? असा सवाल करत फुटकळ लोकं काहीही म्हणतील, त्यांना उत्तर द्यायला बांधील नाही असे म्हणत अजित पवार यांनी फटकारलं