राज ठाकरे यांनी केलेल्या ‘त्या’ मिमिक्रीवर अजित पवार यांनी उडवली खिल्ली, म्हणाले…
VIDEO | राज ठाकरे यांनी केलेल्या 'त्या' मिमिक्रीवर अजित पवार म्हणाले, 'मिमिक्री करणं....'
पुणे : रत्नागिरीतील सभेत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मिमिक्री करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला. राज ठाकरे यांनी अजित पवार यांची केलेली मिमिक्री सध्या जोरदार चर्चेत आहे. अशातच अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांना मिमिक्री करण्याशिवाय दुसरं येतंच काय? असा खोचक सवाल करत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या मिमिक्रीची खिल्ली उडवली. पुण्यात ते माध्यमांशी बोलत असताना त्यांनी राज यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं? मिमिक्री करणं हा त्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे. राज ठाकरे यांना जनतेने कधीच नाकारलं आहे. मागे त्यांनी 14 आमदार निवडून आणले होते. दुसऱ्या टर्मला एक आमदार आला. आमचे जुन्नरचे सहकारी शरद सोनावणेंनी तिकीट घेतलं म्हणून तेवढी पाटी लागली. आता कल्याणचे आमचे सहकारी निवडून आले. त्यांच्याबरोबर जे होते, काही लोकं सोडली तर सर्व लोकं दूर गेली आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याऐवजी, त्यांना अजित पवारांवर मिमिक्री करणं आणि अजित पवार यांचं व्यंगचित्र काढणं यात समाधान वाटतं. यातून ते समाधानी होत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा चिमटा अजित पवार यांनी काढला.