काल गरम, मग आज नरम का? थुंकण्यावरुन झालेला वाद संजय राऊत यांच्यावर उलटला का?
VIDEO | काल राऊत लईच बोलले पण आज खंत व्यक्त करत ते नरमले, काय म्हणाले? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीका करताना जे शब्द वापरले होते. त्यावर खेद व्यक्त केलाय. आपण अजित पवार यांची प्रतिक्रिया अर्धवट ऐकली असे म्हणत पहिल्यांदा संजय राऊत यांनी केलेल्या विधानाला स्वतः चूक ठरवलंय. इतिहासात पहिल्यांदा संजय राऊत यांनी स्वतःच्या विधानाबाबत खंत व्यक्त केली. अजित पवार यांनी अतिशय संयमाने संजय राऊत यांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला. वास्तविक यामागे संजय राऊत यांची भूमिका काय होती हे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलेय. दुसरीकडे मात्र सत्ताधाऱ्यांनी थुंकण्यावरून संजय राऊत यांना धारेवर धरलेय. इतकीच चिड असेल तर आमच्या मतावर खासदार झालेल्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केली. बघा संजय राऊत यांनी कसा घेतला यू-टर्न…
Published on: Jun 05, 2023 08:40 AM
Latest Videos