आशिष शेलार यांनी दाखवलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर अजित पवार म्हणाले…
VIDEO | गोहत्येबाबतचा आशिष शेलार यांनी दाखवलेल्या व्हिडीओचा दावा खोटा खरा की खोटा? अजित पवार म्हणाले...
मुंबई : कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकल्यानंतर विजयाच्या उन्मादामध्ये तिथे काहींनी गाय कापली, असा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. तोच व्हिडीओ भाजप नेते आशिष शेलार यांनी जाहीर कार्यक्रमात दाखवत विरोधकांवर टीका केली. दाखवलेला व्हिडीओहा कर्नाटकचा असल्याचे सत्य मानून जमलेल्या लोकांनाही शेम शेम अशा घोषणा दिल्यात. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. अजित पवार म्हणाले. आशिष शेलार यांनी दाखवलेल्या त्या व्हिडीओच्या खोलात गेल्यानंतर लक्षात आलं की मणिपूरमधील आहे. पत्रकार परिषदेत किंवा सभेत एकादा व्हिडीओ दाखवायचा असेल तर त्याची पहिले शहानिशा केली पाहिजे. त्यात तथ्य आहे की नाही. त्यामुळे तो व्हिडीओ दाखवणारा दोषी असतो. दुसरं कोणी असेल तर समजू शकतो पण आशिष शेलार यांच्यासारखा नेता जर असं करत असेल तर…, असे म्हणत अजित पवार यांनी निशारा व्यक्त केली. तर महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी आहे. आपल्या देशात अनेक लोकं राहतात. प्रत्येकाचं राहणं, खाणं, वेगवेगळे आहे. भारताची वैविध्यतेची संस्कृती असल्याचेही त्यांनी म्हटले.