अजित पवारांचे कट्टर समर्थक विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणार? भेटीगाठी सुरू

अजित पवारांचे कट्टर समर्थक विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणार? भेटीगाठी सुरू

| Updated on: Sep 04, 2024 | 4:10 PM

अजित पवार यांचे कट्टर समर्थक बंडखोरीच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा रंगतेय. अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना काटे यांनी शरद पवारांसह जयंत पाटलांची भेट घेतल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. पण या चर्चांवर बोलताना नाना काटे म्हणाले, मी कुणाला ही भेटलेलो नाही. पण भाजपला चिंचवडची जागा सुटल्यास....

विधानसभा निवडणुकांच्या तारखा गणेशोत्सवानंतर जाहीर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. अशातच अजित पवार यांचे कट्टर समर्थक नाना काटे हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. इतकंच नाहीतर अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना काटे यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेतली असल्याचीही जोरदार चर्चा रंगत आहे. या चर्चांवर नाना काटे यांनी प्रतिक्रिया देत पूर्णविराम दिला आहे. ‘मी कोणालाच भेटलो नाही. माझ्या पद्धतीने मी मतदारांशी भेटीगाठी घेत आहे.’, असे नाना काटे यांनी म्हटले तर ते पुढे असेही म्हटले की, ज्यावेळी अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली तेव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आले की, चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मागण्यात येणार आहे. राज्यातील बऱ्याच जागा अजित पवार यांच्याकडे असल्याने दोन ते तीन जागा सोडून आपण चिंचवडची जागा मागू, असे अजित पवार यांनी सांगितले. यंदाची विधानसभा लढवण्यास मी इच्छूक असून त्यावर मी ठाम आहे, असे नाना काटे यांनी म्हटलं आहे. पण जर भाजपला चिंचवड मतदारसंघ सुटल्यास मी त्या-त्या वेळेस जी कोणती माझी भूमिका असेल ती मी स्पष्ट करणार असल्याचेही नाना काटे यांनी म्हटले आहे.

Published on: Sep 04, 2024 04:10 PM