Special Report | अजित पवार यांनी सांगितला मविआचा फॉर्म्युला; कोणत्या पक्षाला किती जागा?
VIDEO : अजित पवार यांनी सांगितला मविआचा फॉर्म्युला; कोणत्या पक्षाला किती जागा? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मविआचे नेते लोकसभेच्या जागा वाटपावर बोलताय. मात्र आता अजित पवार यांनी चर्चेला सुरूवात व्हावी म्हणून मार्ग सांगितला आहे. मविआकडील सध्याच्या जागा सोडून इतर २५ जागांवर आधी चर्चा होऊ शकते, असे अजित पवार यांनी म्हटले. लोकसभेच्या जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असताना अजित पवार यांनी यावर चर्चा होऊ शकेल असा फॉर्म्युला सांगितलाय. लोकसभा ४८ जागांपैकी ज्या जागा महाविकासआघाडीकडे नाहीत. त्या २५ जागांवर आधी चर्चा होऊ शकते असे अजित पवार यांनी म्हटले. लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजपकडे २३ जागांवर खासदार आहे. तर औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील आणि अमरावतीमध्ये नवनीत राणा हे खासदार आहेत. अशा २५ जांगावर चर्चा करूया, असे पवारांचं म्हणणं आहे. ठाकरे गटाकडून होत असलेल्या १८ जागांच्या दाव्यादरम्यान अजित पवारांना हे म्हटलं आहे. तर स्वतः उद्धव ठाकरे यांनी १८ जागांचा आग्रह धरल्याचे अजित पवार यांनी सांगितलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…