Amol Mitkari : दादांचे दोन नेते भिडले, ‘उन्मतपणा खपवून घेणार नाही’, छगन भुजबळ समर्थकांना अमोल मिटकरींचा थेट इशारा
आम्हीही ओबीसी उन्मतपणा खपवून घेणार नाही, छगन भुजबळ समर्थकांच्या जोडे मारो आंदोलनावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ही टीका केली आहे. तर कायद्याचं राज्य आहे. सामंजस्यानं भूमिका घ्या, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. ‘आम्ही देखील ओबीसी आहोत, आभाळातून आमचा जन्म नाही झाला. ओबीसींच्या पोटीच आमचा जन्म झाला आहे. त्यामुळे अशाप्रकारे जोडे मारो आंदोलन करू […]
आम्हीही ओबीसी उन्मतपणा खपवून घेणार नाही, छगन भुजबळ समर्थकांच्या जोडे मारो आंदोलनावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ही टीका केली आहे. तर कायद्याचं राज्य आहे. सामंजस्यानं भूमिका घ्या, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. ‘आम्ही देखील ओबीसी आहोत, आभाळातून आमचा जन्म नाही झाला. ओबीसींच्या पोटीच आमचा जन्म झाला आहे. त्यामुळे अशाप्रकारे जोडे मारो आंदोलन करू नये’, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी भुजबळ समर्थकांच्या जोडे मारो आंदोलनावर भाष्य केले. पुढे ते असेही म्हणाले, ‘आज माझ्यासारख्या ओबीसी समाजातील व्यक्तीला विधानपरिषदेत संधी दिली. मलाही दादांनी आमदार केलेलं आहे. असे अनेक नेते आहे. जसं की आदिती तटकरे आज ओबीसीचे मंत्री आहेत, ओबीसीचे धनंजय मुंडे हे मंत्री आहेत. दत्ता भरणे हे देखील मंत्री आहे. त्यामुळे कायद्याचं राज्य आहे. सामंजस्यानं भूमिका घ्या, अशाप्रकारे उन्मतपणा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही खपवून घेणार नाहीत कारण आमची निष्ठा दादांच्या चरणी आहे.’, असे अमोल मिटकरी म्हणाले आणि त्यांनी भुजबळ समर्थकांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.