'मंत्रिमंडळ विस्तारा होणार नाही, आणि झाला तर..', राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

‘मंत्रिमंडळ विस्तारा होणार नाही, आणि झाला तर..’, राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jun 17, 2023 | 1:59 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याची सडकून टीका

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याने सडकून टीका केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले, दिल्ली वारी नेहमी ठरलेली असते पण मागच्या वेळी अमित शहा यांनी एकनाथ शिंदे याना तंबी दिली होती की, जे वाचाळ मंत्री आहेत, त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला पाहिजे, त्याबाबत चर्चा होणार असावी, पण मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, आणि झाला तर राज्यात मारामाऱ्या होतील, असं मोठं भाष्य अमोल मिटकरी यांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर केलं. तर अकोल्यात कृषी पथकाच्या ताफ्यात प्रत्येक दुकानाला 5 लाख रुपये मागितले गेले, धाडी अवैध होत्या वसुलीचे रॅकेट होते, मंत्रालयातून पोलिसांना फोन आला आणि कारवाई झाली नाही त्यानंतरही वसुली करण्यात आली. रेड मारणाऱ्या 62 लोकांची यादी अब्दुल सत्तार यांनी जाहीर करावी रक्त कोण पीत हे स्पष्ट होईल, जर चूक नसती तरी मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना झापलं नसतं, मुख्यमंत्र्यांनी झापले अब्दुल सत्तार यांना माफी सुद्धा मागावी लागली, असेही ते म्हणाले.

Published on: Jun 17, 2023 01:55 PM