राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने मनसेला डिवचले, म्हणाले ‘राजसाहेबांनी सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतली तर…’
गुजरातमध्ये जा, मध्यप्रदेशमध्ये जा तिथेही टोल आहे. अविनाश जाधव यांना नेहमीच नाटकीय आंदोलन करण्याची सवय असते. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण अविनाश जाधव यांना एवढीच विनंती आहे की...
ठाणे : 29 सप्टेंबर 2023 | मनसैनिकांना उन्हातान्हात उभे करण्यापेक्षा राजसाहेब ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळ न्यावे. राजसाहेबांच्या घरी शिवतीर्थावर सर्वपक्षीय नेते भेटत असतात. त्यामुळे राजसाहेबांनी शिष्टमंडळासह या नेत्यांची भेट घेऊन मार्ग काढावा. भर उन्हातान्हात मनसैनिकांना उभे करुन हा प्रश्न सुटणार नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे टोल नाक्यावर आंदोलन छेडले आहे. त्यावरून परांजपे यांनी ही टीका केलीय. गुजरात, मध्यप्रदेशमध्येही टोल आहेत. पण, अविनाश जाधव यांना नाटकीय आंदोलन करण्याची सवय आहे. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र त्यांनी राजसाहेब यांना सोबत घेऊन सर्व पक्षीय नेत्यांची भेट घ्यायला हवी असे ते म्हणाले.