‘निधी’वरून धमकीचा मामला…गंमतीनं बोललो, ‘ध’ चा ‘मा’…, अजितदादांचं ‘त्या’ वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीसंदर्भातील वक्तव्यावरून अजित पवारांनी टीकेचा भडीमार होऊ लागल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे. बटण दाबाल तर भरघोस निधी देता येईल, असं वक्तव्य अजित पवार यांनी इंदापूरातील एका प्रचारसभेतील भाषणात केलं होतं. अजित पवारांनी केलेल्या त्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचा पलटवार
निधीबाबत गंमतीनं बोललो, ‘ध’ चा ‘मा’ करु नये, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. निधीसंदर्भातील वक्तव्यावरून अजित पवारांनी टीकेचा भडीमार होऊ लागल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे. बटण दाबाल तर भरघोस निधी देता येईल, असं वक्तव्य अजित पवार यांनी इंदापूरातील एका प्रचारसभेतील भाषणात केलं होतं. ‘आम्हाला कचा कचा कचा बटण दाबून मतदान करा, पाहिजे तेवढा भरघोस निधी देतो. गावचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी हवा तेवढा निधी देऊ. पण आमच्यासाठीही कचा कचा कचा बटन दाबा’, असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या शैलीत इंदापुरात जोरदार भाषण केलं. तर सत्तेची मस्ती आली का? असा सवाल करत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे यांनी पलटवार केला आहे.
Published on: Apr 18, 2024 05:34 PM
Latest Videos