Ajit Pawar : छगन भुजबळ यांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...

Ajit Pawar : छगन भुजबळ यांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्…

| Updated on: Dec 23, 2024 | 3:07 PM

एकीकडे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घडत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छगन भुजबळांच्या नाराजीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

महायुती सरकारच्या अर्थात राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यातच आता छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. छगन भुजबळ यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून ते लवकरच दिल्लीला जाणार असल्याची चर्चाही रंगली आहे, ते नाराज असल्याचा सवाल अजित पवार यांना विचारण्यात आला असता, त्यावर त्यांनी एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांच्या नाराजीवर बोलताना अजित पवारांनी “आमचा तो पक्षांतर्गत प्रश्न आहे. आम्ही तो प्रश्न पक्षातंर्गत सोडवू”, अशी प्रतिक्रिया दिली. अजित पवार हे पुण्यातील सारथीच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी सारथी कार्यालयाला भेट दिली. यावेळी अजित पवारांनी सारथीचे संचालक काकडे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Published on: Dec 23, 2024 03:07 PM