Ajit Pawar : ‘तुम्ही माझे मालक नाही…’, भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
बारामतीच्या एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का? असा सवाल दादांनी केला.
तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी केला आहे. बारामतीच्या एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. अजित पवार मेडदमधील भाषणात बोलत असतानाच काही लोक निवेदन देत होते. भाषण सुरू असतानाच अजित पवार निवेदनं वाचत अधिकाऱ्यांना बोलावून अधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घाला अशी सूचना करताना दिसले. अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांनी पुन्हा नेहमीचाच राग आळवत लोकसभेच्या वेळी लोकांनी जे फसवले त्याची नाराजी थोडीशी जाहीर केली, पण तरी देखील त्यांनी त्यांना मतदान दिले काय आणि मला मतदान दिले काय शेवटी “ताटात पडले काय आणि वाटीत पडले काय” असे म्हणत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याचे संकेत दिल्याचे पाहायला मिळाले. बघा काय म्हणाले अजित पवार?