Chhagan Bhujbal : 'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब म्हणतील तेच...', छगन भुजबळांच्या समर्थनार्थ कुठे झळकले बॅनर?

Chhagan Bhujbal : ‘साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब म्हणतील तेच…’, छगन भुजबळांच्या समर्थनार्थ कुठे झळकले बॅनर?

| Updated on: Dec 23, 2024 | 4:51 PM

पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळात स्थान नसल्याने इंदापूर शहरात छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. “साहेब म्हणतील ते तोरण… साहेब म्हणतील ते धोरण…” अशा आशयाचा मजकूर बॅनरवर छापण्यात आला आहे. महायुती सरकारच्या नुकताचत मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असली तरी मात्र जुन्या अनुभवी ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेश आहे. मंत्रिमंडळात स्थान नसल्याने छगन भुजबळ चांगलेच नाराज झाले आहेत. इतकंच नाहीतर छगन भुजबळांनी त्यांची नाराजी माध्यमांसमोर उघडपणे व्यक्त केली. छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज होते. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान,  छगन भुजबळांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगलेली असताना यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. यावेळी दोघांनी अर्धा तास चर्चा केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Dec 23, 2024 04:51 PM