अंजली दमानिया यांच्या ‘त्या’ आरोपांवर छगन भुजबळ म्हणाले, चौकशी कसली करता…
VIDEO | अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या चौकशीचं काय? अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, 'चौकशी कसली करता मला काही माहिती नाही. महाराष्ट्र सदन केसमधून आम्ही डीचार्ज झालो. त्यांनी कसली मागणी केली आहे, त्याची मला काही कल्पना नाही'
नाशिक, ८ ऑक्टोबर २०२३ | मंत्री छगन भुजबळ यांच्या संस्थांशी संबंधित गैरव्यवहारांची चौकशी कधी सुरू होणार? छगन भुजबळ यांच्यावरील आरोपांच्या चौकशीचं पुढे काय झालं? विधिमंडळात दिलेल्या आश्वासनांनुसार या संदर्भातील फेरविचार याचिका महाराष्ट्र सरकार कधी दाखल करणार आहे? असे सवाल समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. या सवालपर आरोपांवर छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘चौकशी कसली करता मला काही माहिती नाही. महाराष्ट्र सदन केसमधून आम्ही डीचार्ज झालो. त्यांनी कसली मागणी केली आहे, त्याची मला काही कल्पना नाही. मुंबईच्या चारिटेबल ट्रस्टची कुठलीच केस नाही. जी आहे ती चॅरेटीकडे आहे. पूर्वीचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी केलेली केस आहे’, असे छगन भुजबळ म्हणाले.
Published on: Oct 08, 2023 02:10 PM
Latest Videos