नवाब मलिक यांना जामीन मिळाताच अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मला अतिशय...'

नवाब मलिक यांना जामीन मिळाताच अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मला अतिशय…’

| Updated on: Aug 11, 2023 | 6:35 PM

VIDEO | नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मलिक यांना जामीन मिळाल्याचा आपल्याला अतिशय आनंद झाल्याची भावना माध्यमांसमोर व्यक्त केली

नागपूर, ११ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. नवाब मलिक यांना तब्बल दीड वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवाब मलिक यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केलाय. नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाकडून कुणाकडून काय बाजू मांडण्यात आली, याबाबतची डिटेल्स आता येईल. पण सर्वोच्च न्यायालयाने बेल दिली हे सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टात काय झालं, कुणी बाजू मांडली, सरकारच्या बाजूने कुणी बाजू मांडली की याबाबत माहिती घेऊ, असे अनिल देशमुख यांनी म्हटले तर “ईडीची कारवाई ही राजकारणासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर करण्यात येत आहे. पण आज सुप्रीम कोर्टाने जेव्हा निर्णय दिला आणि नबाव मलिक यांना बेल दिली, त्यामुळे मोठा दिलासा नवाब मलिक आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना मिळाला आहे. याचा मला अतिशय आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.

Published on: Aug 11, 2023 06:28 PM