आघाडीत बिघाडी? राष्ट्रवादीने 'मविआ'तून बाहेर पडावे का?, छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

आघाडीत बिघाडी? राष्ट्रवादीने ‘मविआ’तून बाहेर पडावे का?, छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 08, 2023 | 1:38 PM

VIDEO | ... तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, छगन भुजबळांनी संजय राऊत यांना नेमका काय लगावला टोला?

नाशिक : दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून आज शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. शरद पवार हे राजकीय वारस निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचंही अग्रलेखातून म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार साहेबांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात जे म्हटलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. असं असताना संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे? त्यांना असं वाटतं का, की राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे, मनभेद निर्माण व्हावेत? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. तर संजय राऊत यांना हे सर्व आताच उकरून काढायची काय गरज होती? राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकसा आघाडीतून बाहेर पडावे काय?, असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे का? अशा चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: May 08, 2023 01:38 PM