Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal Video : पंकजा मुंडे आपला वेगळा पक्ष काढणार? छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

Chhagan Bhujbal Video : पंकजा मुंडे आपला वेगळा पक्ष काढणार? छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Feb 10, 2025 | 2:50 PM

नाशिक येथे आयोजित वारकरी भवनातील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये वेगळा पक्ष उभा करण्याची ताकद आणि तितकी संख्या आहे. फक्त तेच गोळा केले तर वेगळा पक्ष निर्माण होऊ शकतो असे म्हटले होते

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा साठा केला तर एक वेगळा पक्षच तयार होईल. वेगळा पक्ष उभा करण्याची ताकद आणि तितकी संख्या गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची आहे. फक्त तेच गोळा केले तर वेगळा पक्ष निर्माण होऊ शकतो, असं वक्तव्य भाजपच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होते. तर गोपीनाथ मुंडे यांनीच भाजप हा पक्ष उभा केल्याचे आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी म्हटलं. पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली. “आपल्यापुढे अशी कित्येक उदाहरणं आहेत. काही समाजाने, घटकाने वेगवेगळे पक्ष काढले, ते कितपत चालले, त्यांना कितपत यश मिळालं, याचा लेखाजोगा त्यांनी घ्यावा, असं भुजबळांनी म्हटलं. पण पंकजा मुंडेंनी त्याचा अभ्यास केला असेल. मात्र त्यांनी असं म्हटलं म्हणून त्या काही पक्ष काढतील, असं काही मला वाटत नाही. स्व. मुंडे साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे, एवढाच अर्थ त्याचा आहे”, असं मला वाटतं, असं भुजबळांनी नमूद केलं. “स्वतंत्र पक्ष कोणीही काढू शकतं. पंकजाताई म्हणतात त्याप्रमाणे त्या मोठाही पक्ष असू शकतील. पण माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्यामध्ये यश मिळवणं, हे कितपत यशदायी आहे, याची मला कल्पना नाही. मग तो कुठलाही समाज असो”, असंही छगन भुजबळ म्हणाले.

Published on: Feb 10, 2025 02:50 PM