Video : “…म्हणून मी शिवसेनेतून बाहेर पडलो”, छगन भुजबळांनी सांगितला ‘तो’ किस्सा
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज नाशिक दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडली. काल ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) सुनावणी झाली त्यावरही त्यांनी आपलं मत मांडलं. आमचा लढा दोन अडीच वर्षांचा नाही. मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेनेतून बाहेर पडलो आणि 91 साली समता परिषदेची स्थापना झाली. तेव्हापासून आमचा ओबीसींसाठी लढा […]
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज नाशिक दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडली. काल ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) सुनावणी झाली त्यावरही त्यांनी आपलं मत मांडलं. आमचा लढा दोन अडीच वर्षांचा नाही. मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेनेतून बाहेर पडलो आणि 91 साली समता परिषदेची स्थापना झाली. तेव्हापासून आमचा ओबीसींसाठी लढा सुरू आहे. मंडल आयोगाचे स्वागत केल्यामुळेच शिवसेनेत आमची खडाखडी सुरू झाली. आणि त्यानंतर शिवसेना सोडली. काही लोक आम्हाला विचारतात तुम्ही अडीच वर्षे फुकट घालवली. मात्र कोरोनामुळे दोन वर्षे सर्वजण घरात बसले होते. सिन्नरमध्ये सरपंच, उपसरपंच ओबीसी असतानाही तिथे शून्य ओबीसी दाखवले. शिंदे फडणवीस सरकारचे आभार आज ओबीसींच्या बाजूने निकाल लागतोय. त्याचा आनंद आहे, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.