Chhagan Bhujbal: ‘… पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच’, छगन भुजबळांचा संताप
मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हेच शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणी नाकारलं हे शोधावं लागेल, असं म्हणत छगन भुजबळ म्हणाले आणि त्यांनी पुन्हा एकदा महायुतीवर निशाणा साधत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ असून ते देखील आता नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्रिपद न देण्यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा भाष्य करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी तुमच्या हातातलं खेळणं नाही’, असं वक्तव्यच छगन भुजबळ यांनी केलं आहे. पुढे ते असेही म्हणाले प्रश्न मंत्रिपदाचा नाही पण माझी अवहेलना झाली असल्याचे म्हणत छगन भुजबळ कडाडले आणि महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळांनी संताप व्यक्त केला. तर मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हेच शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणी नाकारलं हे शोधावं लागेल, असं म्हणत छगन भुजबळ म्हणाले आणि त्यांनी पुन्हा एकदा महायुतीवर निशाणा साधत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तर प्रत्येक पक्षाचा निर्णय पक्षाचा प्रमुख घेत असतो. जसे भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. त्याप्रमाणे आमच्या गटाचा राष्ट्रवादीचा निर्णय हा अजित पवार घेतात, असं म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवारांना टोलाही लगावल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येकाला मंत्रिपद हवं असते. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, ज्याप्रकारे अवहेलना करण्यात आली, त्याचा आहे, असे म्हणत छगन भुजबळ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.