Beed Sarpanch Murder Case : बीड प्रकरणात चौकशी पूर्ण नाही, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? छगन भुजबळांचं रोखठोक मत
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्यांचा राजीनामा घेऊन तुमचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं बघा काय म्हणाले?
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कारड यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहे. तर वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे विरोधकांनी थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांचा राजीनामा घेऊन तुमचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं. “मला मंत्री व्हायचं आहे, म्हणून कोणाचा तरी बळी घ्यावा, राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या स्वप्नातही येणार नाही” असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. पुढे भुजबळ असेही म्हणाले, “मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे. मला सांगायचं आहे की फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं मी पूर्ण चौकशी करणार. चौकशीत कोण सापडले, आका काय काका काय त्या सर्वांवर कारवाई करू. त्या आधी मुंडेंचा राजीनामा का मागत आहात? चौकशीतून काही आलं का? तुमच्याकडे काही असेल तर पोलिसांकडे द्या. जोपर्यंत चौकशीतून काही येत नाही. तोपर्यंत राजीनामा मागणं चुकीचं आहे. मला हे बरोबर वाटत नाही. साप साप म्हणून भूई थोपटणं हे योग्य नाही” असं छगन भुजबळ म्हणाले.