Chhagan Bhujbal | OBC आरक्षणासाठी तुम्ही दिल्लीत जा, छगन भुजबळ आक्रमक

| Updated on: Dec 23, 2021 | 8:40 PM

राजकारण बाजूला ठेवा, आपण धरणे धरा, पण गुरुकिल्ली दिल्लीत फिरवायची असेल तर चंद्रकांत पाटील, फडणवीस तुमची गरज आहे, अशी साद छगन भुजबळ यांनी घातली आहे. तुम्ही दिल्लीत जा, जात असाल तर तिकीट काढून देतो, पण तुमचं‌ त्यांनी ऐकलं पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले आहेत.

मुंबई : राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत दिलेल्या ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर राज्यातले वातावरण पुन्हा आरक्षावरून तापले आहे. इंपेरिकल डेटावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याचवेळी राजकारण बाजूला ठेवा, आपण धरणे धरा, पण गुरुकिल्ली दिल्लीत फिरवायची असेल तर चंद्रकांत पाटील, फडणवीस तुमची गरज आहे, अशी साद छगन भुजबळ यांनी घातली आहे. तुम्ही दिल्लीत जा, जात असाल तर तिकीट काढून देतो, पण तुमचं‌ त्यांनी ऐकलं पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले आहेत.