Chhagan Bhujbal | सुजय विखे यांच्याकडे रेमडेसिवीरचा साठा कुठुन आला? : छगन भुजबळ

| Updated on: Apr 27, 2021 | 7:01 PM

सुजय विखेंनी रेमडेसिविरचा साठा कुठुन आणला? असा सवाल करीत अन्न आणि प्रशासन मंत्री मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. (Ncp leader chhagan bhujbal target bjp mla sujay vikhe on remedisivir injection stock)

मुंबई : रेमडेसिवीर काय विरोधी पक्ष नेत्यांच्या घरात बनतं का? त्यांना पुरवतं कोणं? याच देशातील फार्मा कंपन्या ते तयार करतात. उपकार करतात का ते महाराष्ट्रावर? फक्त बीजेपी करतंय असं ते सांगतात पण ते काहीच करू शकत नाही. सर्वांनी मिळून काम केलं तर हा कोरोना आटोक्यात येणार आहे. सुजय विखेंनी रेमडेसिविरचा साठा कुठुन आणला? असा सवाल करीत अन्न आणि प्रशासन मंत्री मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे.