‘तर अनेक जणांचा कार्यक्रम झाला असता’, नाव न घेता धनंजय मुंडे यांनी कुणाचा घेतला समाचार
VIDEO | धनंजय मुंडे असं काय बोलले? कुणावर केली बोचरी टीका, ज्याची बीडमध्ये सर्वत्र होतेय चर्चा ?, बघा व्हिडीओ काय म्हणाले?
बीड : जवाहर एज्युकेशन सोसायटी प्रचार निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. पंकजा मुंडे बिनविरोध निवडून आल्या नसत्या तर अनेक जणांचा कार्यक्रम झाला असता नाव न घेता धनंजय मुंडे यांनी समाचार घेतला आहे. जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक प्रचारादरम्यान धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. ते म्हणाले, समोरच्यांचं पॅनल हा फक्त त्यांची चोरी लपवण्यासाठी उभा आहे आणि कदाचित एक मेंबर बिनविरोध निघाला नसता तर बऱ्याच जणांचा कार्यक्रम उरकला असता असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांची जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर बोचरी टीका केली. जवाहर एज्युकेशन सोसायटीमध्ये केलेल्या कामांबद्दल नाराजी व्यक्त करत आपला विजय निश्चित असल्याचे देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.