‘सरदार आहात, तुम्हीच बारामती लढा; ताकद पाहायची असेल तर…’, चंद्रशेखर बावनकुळे यांना कुणाचा इशारा?
VIDEO | चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक लढवावी अन् बारामतीची ताकद पहावी, कुणी दिला इशारा
पुणे : पुणे जिल्हा कुणाची जहागिरदारी नाही, आम्ही बारामती जिंकू, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. इतकेच नाही तर ते सातत्याने पावर कुटुंबियांवर निशाणा साधताना देखील दिसताय. यावर राष्ट्रवादीचे नेते दिलीप मोहिते पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘चंद्रशेखर बावनकुळे इतके मोठे असते तर त्यांचं तिकीट कापलं नसतं. त्यांच्या निवडून येण्याची खात्री नव्हती. जो मागच्या दाराने विधानपरिषदेत निवडून आलाय. तो बारामतीबद्दल काय भाष्य करणार?’, असा सवाल दिलीप मोहिते पाटील यांनी उपस्थित केलाय. पुढे ते असेही म्हणाले की, ज्यावेळी अजित पवार यांच्याकडे ऊर्जा खातं होतं तेव्हा ठेकेदारीचं काम बावनकुळे यांनी केलंय, त्यामुळे त्यांना अनुभव घ्यावा. तर चंद्रशेखर बावनकुळे यांना बारामतीची ताकद पाहायची असेल तर त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी दुसऱ्यांचा बळी का द्यावा, असे म्हणत इशारा दिला आहे.