त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; एकनाथ खडसेंनी घेतली भाजपच्या ‘या’ दोन बड्या नेत्यांची नावं
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटातील आमदार एकनाथ खडसे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना भाजप पक्ष प्रवेशावर सखोल चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्यातील दोन बड्या नेत्यांची नावं घेत त्यांनी माझा भाजप प्रवेश रोखला असं स्पष्ट सांगितले. बघा व्हिडीओ नेमकं काय म्हणाले?
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची विनंती आली, यावेळी मी वेळ मागितला. पण ते म्हणाले वेळ कशाला हवाय? आताच प्रवेश करून घ्या… असे एकनाथ खडसे म्हणाले. पुढे त्यांनी असेही सांगितले, त्यावेळी मी दिल्लीत होतो. विनोद तावडे, रक्षा खडसे असे आम्ही एकत्रित जे पी नड्डा यांना भेटलो. यावेळी नड्डा यांनी मझ्या गळ्यात मफ्लर घातलं आणि भाजप पक्षप्रेवश झाला असं सांगितलं. या प्रवेशावर राज्यातील काही नेत्यांनी विरोध केला. माझी इच्छा नव्हती पण वरिष्ठाच्या सूचना आल्यात आणि मी भाजपात प्रवेश केला. मी स्वत:हून भाजपमध्ये प्रवेशासाठी विनंती केली नव्हती. परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला भाजपमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले. त्यानंतर मी भाजपच्या नेत्यांची दिल्लीत भेट घेतली. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाची प्रक्रिया झाली. परंतु त्यानंतर राज्यातील भाजप नेते गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माझ्या भाजप प्रवेशाला विरोध झाला. त्यामुळे माझा भाजप प्रवेश रखडला.