'सरकारमधले मंत्री निगरगट्ट, त्यांच्या दातखिळ्या बसल्या', कुणाचा हल्लाबोल?

‘सरकारमधले मंत्री निगरगट्ट, त्यांच्या दातखिळ्या बसल्या’, कुणाचा हल्लाबोल?

| Updated on: Jun 16, 2023 | 7:21 AM

VIDEO | 'विरोधात असणारे मंत्री आंदोलन करायला उतरले होते, मात्र आता कोणत्या बिळात लपले ', राष्ट्रवादीच्या बड्या नेच्याचा रोख नेमका कुणावर?

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कापसाला मिळणाऱ्या भावावरून सरकारला धारेवर धरताना एकनाथ खडसे म्हणाले, हे सरकार मधले मंत्री निगरगट्टं आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी आमचे गिरीश महाजन यांनी कापसाला दहा हजार रुपये भाव मिळावा यासाठी अमरण उपोषण केलं होतं. मात्र आता कापसाला साडेसहा हजार रुपये फक्त भाव आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असे असतानाही विरोधात असणारे हेच मंत्री आता समोर येत नाहीत, तर कुठे ते? असा सवालही एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. तर हे सरकार धीमं आहे. कापसाच्या दरवाढीबाबत सरकारमधील मंत्री आपलं वजन सरकार दरबारी खर्च करायला तयार नाही, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी सरकारवर खोचक निशाणा साधला आहे.

Published on: Jun 16, 2023 07:21 AM