'हे सरकार नुसतं घोषणाबाजी करणारं', राष्ट्रवादीच्या नेत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारला फटकारलं

‘हे सरकार नुसतं घोषणाबाजी करणारं’, राष्ट्रवादीच्या नेत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारला फटकारलं

| Updated on: Aug 16, 2023 | 5:38 PM

VIDEO | शेतकऱ्यांच्या प्रश्नी राष्ट्रवादीच्या नेत्याची राज्य सरकारवर सडकून टीका, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अद्यापही पंचनामे देखील झाले नसून कोणतीच मदतही नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर केला आहे.

जळगाव, १६ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसानं संपूर्ण राज्याला झोडपून काढलं होतं. तर राज्यातील काही जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या अतिवृष्टीमुळे बळीराजाचं मोठं नुकसान झाल्याचे पाहायला मिळालं. यावेळी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून मदत करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र अद्याप त्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं, सर्वसामान्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. किमान नुकसानग्रस्तांना 10 हजार मदत देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्र्यांनी घोषणा केली होती. मात्र अद्यापही पंचनामे देखील झाले नाहीत आणि कोणतीच मदतही मिळालेली नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर केला आहे. तर हे सरकार नुसतं घोषणाबाजी करणारं सरकार आहे, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल करत सरकारवरच टीकास्त्र सोडल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Aug 16, 2023 05:37 PM