शिंदे गट आणि भाजपातील मतभेद आता चव्हाट्यावर, राष्ट्रवादी नेत्याचं खोचक भाष्य
VIDEO | राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची शिंदे आणि भाजप गटावर साडकून टीका, काय आहे कारण?
जळगाव : भाजपा आणि शिंदे गटात एवढे मतभेद आहेत ज्याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापासून व्हायला लागली असेल तर या दोघा पक्षामधील महाराष्ट्रातील चित्र काय असेल याचा अंदाज यावरून येतो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलीय. शिंदे गट आणि भाजप या दोघांमधले मतभेद आता चव्हाट्यावर आलेत. कल्याणमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये श्रीकांत शिंदे हे जे एकनाथ शिंदेचे चिरंजीव खासदार आहेत या विभागाचे त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांनी व्यथित होऊन आपण राजीनामा देण्याच्या तयारीत आहे अशी उद्विग्न प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेनी दिलीय. खासदारांच्या राजीनाम्यापर्यंत हा विषय येतो त्यावेळेस परिस्थिती काही नीट आहे असे नाही मुख्यमंत्र्यांच्या घरापासून सुरुवात व्हायला लागलेली आहे तर उभ्या महाराष्ट्र मधलं काय असेल चित्र याचा अंदाज आपण घेऊ शकतो, असे खडसे म्हणाले.