गिरीश महाजन श्रीमंत माणूस पण त्यांची किंमत एक रूपयाची, कुणाचा हल्लाबोल?

गिरीश महाजन श्रीमंत माणूस पण त्यांची किंमत एक रूपयाची, कुणाचा हल्लाबोल?

| Updated on: Jan 16, 2024 | 5:29 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन या दोघांमधील राजकीय वैमानस्य संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. एकमेकांवर अगदी टोकाला जाऊन टीका आरोप प्रत्यारोप दोघे मातब्बर नेते नेहमी करत असतात.

जळगाव, १६ जानेवारी २०२४ : माझ्याजवळ गिरीश महाजन यांची किंमत फक्त एक रुपयाची आहे, असा जोरदार हल्लाबोल करत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन या दोघांमधील राजकीय वैमानस्य संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. एकमेकांवर अगदी टोकाला जाऊन टीका आरोप प्रत्यारोप दोघे मातब्बर नेते नेहमी करत असतात. दरम्यान, गेल्या काळात मंत्री गिरीश महाजन यांनी खोटे विधान करून छळण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे समाजात बदनामी झाली असा आरोप करत एकनाथ खडसे यांनी आज जळगाव जिल्हा न्यायालयात उपस्थित राहून मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला असून एक रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा दाखल केला आहे.

Published on: Jan 16, 2024 05:29 PM