गेले ‘नाथाभाऊ’ कुणीकडे? नेता नॉट रिचेबल झाल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा

| Updated on: Jan 17, 2023 | 3:09 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे सलग ८ दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. फोनवर संपर्क साधण्यासाठी सहज उपलब्ध असणारे एकनाथ खडसे आता संपर्क क्षेत्राच्या बाहेर अर्थात नॉट रिचेबल झाले आहेत. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने आणि गेल्या आठ दिवसांपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल लागत असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची तक्रार आहे. […]

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे सलग ८ दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. फोनवर संपर्क साधण्यासाठी सहज उपलब्ध असणारे एकनाथ खडसे आता संपर्क क्षेत्राच्या बाहेर अर्थात नॉट रिचेबल झाले आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने आणि गेल्या आठ दिवसांपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल लागत असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची तक्रार आहे. पहिल्यांदाच एकनाथ खडसे यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच गेल्या पाच ते सहा दिवसांपासून खडसे यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क होत नसल्याने आणि खडसे यांचे दोन्ही फोन नॉट रिचेबल येत असल्याने राज्याच्या राजकारणात काही महत्त्वाची घडामोड समोर येणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे, तर एकनाथ खडसे मुंबईत असल्याचेही माहिती मिळत आहे.

Published on: Jan 17, 2023 03:09 PM