Jalgaon | माझ्या एवढ्या चौकशा झाल्या तो राजकीय विषय नव्हता Eknath Khadse यांचा टोला

Jalgaon | “माझ्या एवढ्या चौकशा झाल्या तो राजकीय विषय नव्हता” Eknath Khadse यांचा टोला

| Updated on: Jun 18, 2021 | 2:30 PM

बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारप्रकरणात सरकारकडून होत असलेली कारवाई योग्य असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणी विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर हा कसा असेल, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

ते शुक्रवारी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जळगाव बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात होत असलेली कारवाई ही राजकीय हेतूने केली जात आहे, असे नाही. या प्रकरणात कोणाची नावे आहेत, याची मला माहिती नाही. परंतु, या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.