'भाजप-सेनेची युती तुटली तेव्हा गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरत होते', कुणी केला हल्लाबोल

‘भाजप-सेनेची युती तुटली तेव्हा गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरत होते’, कुणी केला हल्लाबोल

| Updated on: Aug 10, 2023 | 5:39 PM

VIDEO | सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अर्धवट माहिती, युतीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यानं काय लगावला टोला?

जळगाव, १० ऑगस्ट २०२३ | उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना आणि भाजपची युती तोडली होती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील खासदारांच्या बैठकीत हे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचं सुधीर मुनगंटीवार यांच्यापासून ते गिरीश महाजन यांनी सर्वांनीच समर्थन केलं होतं. मात्र राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी या नेत्यांचं म्हणणं अमान्य करत ते खोडून काढले आहे. एकनाथ खडसे म्हणाले, ‘भाजप – शिवसेनेची युती तुटली त्यावेळेस गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरत होते. त्यावेळी गिरीश महाजन यांचा कोणत्याही चर्चेत सहभागी नव्हते. त्या कालखंडातील दिल्लीच्या कोर कमिटीच्या बैठकीला महाजन यांना बोलावल्या जात नव्हतं. त्यावेळी भाजपची सूत्र मी विरोधी पक्षनेते असताना आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होती. त्यामुळे मधल्या कोणत्याच गोष्टी महाजन यांना माहिती नव्हत्या, असं सांगतानाच कमीत कमी माहिती घेऊन त्यांनी बोलायला हवं’, असं म्हणत त्यांनी टोलाही लगावला आहे.

Published on: Aug 10, 2023 05:39 PM