Jayant Patil On Amol Mitkari | अमोल मिटकरींचं विधान वैयक्तिक’जयंत पाटलांची प्रतिक्रिया
कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. ते त्यांच्या वक्त्यव्यावर ते ठाम असले तरी माझ्या सांगली जिल्ह्यातील व्यासपीठावर हे वक्त्यव्य झालं. माझी भावना उदामपणाची नाही, समाजाने गैर समज करून घेऊ नये, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले.
कोल्हापूर : त्या दिवशी मिटकरी यांनी अनेकांना कोपरखळ्या मारल्या. लग्नातील मंत्राच्या वक्त्यव्यानंतर मी देखील त्यांना माईक टॅप करून भाषण थांबवण्याच्या सूचना केल्या. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. ब्राह्मण समाजाने आम्हाला नेहमीच सहकार्य केलंय. समाजाला दुखवण्याचा हेतू सभेचा नव्हता. मला ही वक्तव्याबद्दल खेद वाटतो. समाजाला विनंती करेन आमचा तो हेतू नाही. ब्राम्हण आणि अन्य समाजासाठी अमृत योजना आम्ही आणतोय. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. ते त्यांच्या वक्त्यव्यावर ते ठाम असले तरी माझ्या सांगली जिल्ह्यातील व्यासपीठावर हे वक्त्यव्य झालं. माझी भावना उदामपणाची नाही, समाजाने गैर समज करून घेऊ नये, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले.
Latest Videos