हा तर फुगवलेला फुगा, जितेंद्र आव्हाड यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर खोचक टीका
आर्थिक मंदी आली असताना भारत त्याला कसं सामोरं जाईल, ही आशा देखील अर्थसंकल्पातून धुळीस मिळाली; जितेंद्र आव्हाड यांची जोरदार टीका
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील पाचवं आणि शेवटचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अर्थसंकल्प म्हणजे देशाची दिशा दाखवणारं आणि भविष्यात काय करणार आहोत, हे सांगणारं वास्तव म्हणजे अर्थसंकल्प. एकीकडे आर्थिक मंदी आली असताना भारत त्याला कसं सामोरं जाईल, ही आशा देखील धुळीस मिळाली आहे. सर्वसामान्यांना यातून काही मिळाले असे वाटत नाही. बजेट म्हणजे फुगवलेले आकडे बाकी त्यात सत्यता नाही, त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ फुगवलेला फुगा असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
Published on: Feb 01, 2023 02:24 PM
Latest Videos