'मिमिक्रीने काही होणार नाही तर...', राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज ठाकरे यांना खोचक टोला

‘मिमिक्रीने काही होणार नाही तर…’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज ठाकरे यांना खोचक टोला

| Updated on: Jun 14, 2023 | 1:16 PM

VIDEO | राज ठाकरे यांना भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरवरून राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं डिवचलं

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस साजरा केला जात आहे. राज ठाकरे यांचे कार्यकर्ते आणि चाहते त्यांना सोशल मिडीयासह त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावर प्रत्यक्ष दाखल होत शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसताय. दरम्यान, राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे. या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेखही करण्यात आला आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारानं राज ठाकरे यांनी डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. ‘राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले. त्यांना शुभेच्छा. आता त्यांच्याकडे एकच आमदार आहे. हा आकडा 50 पर्यॅत न्यावा लागेल. नुसत्या नकला काढून होणार नाही’, असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

Published on: Jun 14, 2023 01:16 PM