खुर्ची खेचण्याची संस्कृती कुणाची? राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याची टीका

खुर्ची खेचण्याची संस्कृती कुणाची? राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची टीका

| Updated on: Sep 24, 2022 | 11:01 AM

शिंदे गटाच्या नेत्याने सुप्रिया सुळे यांचा एक मॉर्फ फोटो व्हायरल केला. त्या महिला नेत्याला पवार घराणं किती माहिती आहे, यावर आता आम्हाला शंका येतेय, असं वक्तव्य महेश तपासे यांनी केलंय.

मुंबईः खुर्ची खेचण्याची संस्कृती पवार घराणं, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नाही. दुसऱ्याची खुर्ची खेचून त्यांच्यावर बसण्याची संस्कृती कुणाची आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केलंय. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री यांच्या बोर्डासमोरील खुर्चीवर बसलेला एक फोटो शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्याकडून पोस्ट करण्यात आलाय. मात्र हा फोटो मॉर्फ असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येतंय. शिंदे गटाच्या नेत्याने सुप्रिया सुळे यांचा एक मॉर्फ फोटो व्हायरल केला. त्या महिला नेत्याला पवार घराणं किती माहिती आहे, यावर आता आम्हाला शंका येतेय, असं वक्तव्य महेश तपासे यांनी केलंय.

Published on: Sep 24, 2022 11:01 AM