बीड जाळपोळ प्रकरणातील आरोपी शिंदे गटातील जिल्हाध्यक्षांचा भाचा? मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल
बीड जाळपोळ प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबतचे फोटो समोर आलेत. राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी हे फोटो ट्वीट केलेत. त्यामुळे आरोपीच्या फोटोमुळे पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू
मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३ : बीड जाळपोळ प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबतचे फोटो समोर आलेत. राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी हे फोटो ट्वीट केलेत. त्यामुळे आरोपीच्या फोटोमुळे पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. मराठा आंदोलनादरम्यान ३० ऑक्टोबरला जी जाळपोळ झाली त्याची धग अद्याप कायम आहे. बीडमधील दगडफेक आणि जाळपोळीनंतर राजकीय आरोपांचा धूरही सर्वत्र पसरला आहे. मराठा आरक्षणासाठी दोन महिन्यांपासून लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. तर प्रकाश सोळंकी, जयदत्त क्षीरसागर यांनीही जाळपोळपोळीमागे राजकीय संबंध असल्याचे म्हटलं होतं. याच प्रकरणातील एक-एक धागा पोलिसांच्या हाती लागतोय. बीड पोलिसांनी आरोपी पप्पू शिंदे याला अटक केली. या जाळपोळीनंतर पप्पू शिंदे फरार झाला होता. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट