नोटबंदीवरून जुपंली, सदाभाऊ खोत यांच्या ‘त्या’ मागणीवर अमोल मिटकरी यांचा टोला
VIDEO | दोन हजाराच्या नोटबंदीवरून अमोल मिटकरी आणि सदाभाऊ खोत यांच्यात जुंपली, बघा काय केले आरोप-प्रत्यारोप
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्या पाचशे आणि शंभर रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या मागणीवर खोचक टोला लगावला. इतकेच नाही तर राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना विनंती केली की सदाभाऊ खोत यांना लवकरात लवकर प्रधानमंत्री करा. जसं पंतप्रधान मोदी यांनी २ हजारची नोट बंद केली तसं सदाभाऊ या नोटा बंद करतील. मंत्रिमंडळ पदासाठी ते भाजपमध्ये जाणार असल्याचे मनसुबे दिसताय. सदाभाऊ खोत यांनी दाबल्या का २ हजाराच्या नोटा असा टोला लगावत खोचकी टीकाही केली. यावर सदाभाऊ खोत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला पंतप्रधान पदाचे डोहाळे लागलेले नव्हते तुमचा पक्ष हा सरदारांचा असून तुमच्याच पक्षाकडे 2000 /500 च्या नोटा पोत्याने असल्याने तुमचा थयथयाट सुरू आहे’, असा आरोप अमोल मिटकरी यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी केला. यावरून अमोल मिटकरी आणि सदाभाऊ खोत यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.