रविकांत तुपकर राष्ट्रवादीच्या वाटेवर? एकनाथ खडसे यांच्यासह बंद दाराआड तासभर चर्चा, तुपकर स्पष्टच म्हणाले…
VIDEO | बुलढाण्यात चर्चांना उधाण, एकनाथ खडसे आणि रविकांत तुपकर यांच्यात बंद दाराआड तासभर नेमकी काय झाली चर्चा?
बुलढाणा : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे जिल्हाधिकारी यांना बुधवारी भेटण्यासाठी आले होते, यावेळी त्यांनी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या कार्यालयाला भेट दिली असून रविकांत तुपकर आणि एकनाथ खडसे यांच्यात जवळपास एक तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा बुलढाण्यात रंगू लागली आहे. त्यावेळी यावर रविकांत तुपकर यांना विचारलं असता त्यांनी सध्याच काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र आता रविकांत तुपकर यांनी एकनाथ खडसे यांच्यासह झालेल्या भेटीबाबत भाष्य केले आहे. रविकांत तुपकर म्हणाले, ‘ गेल्या काही वर्षांपासून एकनाथ खडसे यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आहे. खडसे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. पीक विमा प्रश्नासाठी तुरुंगात असताना खडसे माझ्या कुटुंबाच्या पाठीमागे ताकदीने उभे राहिले. एकनाथ खडसे बुलढाणा आले असताना त्यांनी माझ्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी सामाजिक, राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा झाली’. तर आमच्या भेटीचा राजकीय अर्थ लावू नये. विरोधक वातावरण निर्माण करून संशय निर्माण करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.