Praful Patel नेमकं काय म्हणाले?, ‘पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळणार तर त्यांना…’
VIDEO | 'शरद पवार यांच्याशी माझे बोलणे होत असते, मी त्यांच्या संपर्कात...तर अजित पवार कुठल्याही बाबतीत तडजोड करणारा माणूस नाही', राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काय केला मोठा गौप्यस्फोट?
अमरावती, ४ सप्टेंबर २०२३ | आम्हालाही कायद्याचा अभ्यास आहे. जेव्हा निकाल येईल तो आमच्या बाजूने लागेल. पक्ष आम्हाला मिळेल. चिन्ह आम्हाला मिळेल. त्यांना नवीन पक्ष काढावा लागेल. अजित पवार कुठल्याही बाबतीत तडजोड करणारा माणूस नाही, असं थेट वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या या विधानानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही जणांना वाटत हे तीन चाकी सरकार आहे. पण हे सरकार व्यवस्थित चालेल, असा दावाही प्रफुल्ल पटेल यांनी अमरावतीत केला. तर शरद पवार यांच्याशी माझे बोलणे होत असते, मी त्यांच्या संपर्कात आहे, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. गेल्या वेळी अमरावतीला शरद पवार यांच्या सोबत आलो आज अजित पवार यांच्या सोबत आलो आहे. आमचा पक्ष बळकट करण्यासाठी मी आलो असून अनेकांच्या मनात संभ्रम आहे की खरंच मी इकडे आलो? की शरद पवार यांनी मला पाठवले? शरद पवार यांच्या बद्दल असलेला आदर आजही कायम आहे आणि पुढेही राहील, असा शब्दही त्यांनी दिला.