Praful Patel : ‘शरद पवारांकडून माहिती घेतली असतीर तर बरं झालं असतं’, राऊतांच्या ‘त्या’ टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'प्रफुल्ल पटेल दाऊदच्या पक्षातून भाजपमध्ये आले. भाजपमध्ये का आले तर आपली संपत्ती वाचवायला. तुरुंगात जाण्याची भीती असल्याने बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सर्व संबंधासह भाजपात गेले.', राऊतांची सडकून टीका
‘माझ्यावर बोलण्याआधी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं., असं वक्तव्य करत प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तर माझ्यावर बोलण्याआधी शरद पवार यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे होती, असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना जोरदार निशाणा साधला आहे. ‘माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण शरद पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं.’, असं ट्वीट करत प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर पलटवार केला आहे. यासह प्रफुल्ल पटेल यांनी आणखी एक ट्वीट करत अंगूर खट्टे है… असं म्हणत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना टॅग केल्याचे पाहायला मिळत आहे. ‘आपल्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसून हा माणूस पळाला. शरद पवार त्यांचा बाप आहे. शरद पवार हे त्यांच्या वडिलासमान होते. त्यांच्या पाठित खंजीर खुपसून पळाले’, असं म्हणत संजय राऊत यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेतून प्रफुल्ल पटेल यांच्यावर सडकून टीका केली होती.

युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..

'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?

'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...

राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्यांसाठी डोकेदुखी?
