Breaking | खनीजकर्म महामंडळात कोट्यावधींचा घोटाळा ; राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवारांचा आरोप
खनीजकर्म महामंडळांतील कोल वॅाशरीजमध्ये 43 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप करत, याची ईडी आणि सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केलीय राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी.
ईडीची पिडा टळावी म्हणून एकीकडे महाविकास आघाडीतील काही नेते प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे खनीजकर्म महामंडळांतील कोल वॅाशरीजमध्ये 43 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप करत, याची ईडी आणि सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केलीय राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खनीजकर्म महामंडळांच्या टेंडर प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. पण नाना पटोले यांनी फक्त काम न दिलेल्या कंपनीवर आक्षेप घेतला, पण ज्या हिंद एनर्जी आणि अरिहंत या दोन कंपन्यांना काम दिलं, या कंपन्यांनी 15 लाख टन कोळसा नेला. त्याची ED आणि CBI कडून चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी केलीय. भाजप सरकारच्या काळात हे टेंडर दिल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केलाय.
Latest Videos