राज्यात ५० टक्के कमिशनचा रेट सुरू आहे, ‘या’ नेत्याचा सरकारवर गंभीर आरोप
VIDEO | राज्यात सध्या टक्केवारीचा खेळ जोरात, 'या' नेत्याचा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल
मुंबई : महाराष्ट्रात सध्या ५० टक्के कमिशनचा रेट चालू आहे. कमिशनचा उपयोग राज्यातील राजकारणासाठी होतोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. इतकंच नाही तर रोहित पवार पुढे असेही म्हणाले की, राजकारणासाठी आणि लोकांना फोडण्यासाठी पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे टाकले जात नाहीत. आता ते पैसे कुठून येतात, याचा अंदाज सामान्य लोकांना आला आहे. लोकं शांत बसतात. पण जेव्हा निवडणूकीची वेळ येते तेव्हा लोकशाहीच्या बाजूने ते निर्णय देतात. राज्यातील विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. राज्यात सध्या टक्केवारीचा खेळ जोरात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. दरम्यान, रोहित पवार यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, मागच्या सरकारमध्ये कोणता रेट होता, याचा अनुभव रोहित पवार यांना होता. मागच्या सरकारमध्ये काय रेट चालायचा याची माहिती नवख्या आणि अभ्यासू आमदाराला माहिती आहे, असा खोचक टोलाही त्यांनी रोहित पवार यांना लगावला.