‘चंद्रशेखर बावनकुळे यांनी तमाशाला जाणं कमी करावं’, ‘या’ महिला नेत्याची जीभ घसरली अन्…
VIDEO | शरद पवार यांच्या राजीनाम्यावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका अन् या टीकेला 'या' महिला नेत्यानं दिलं प्रत्युत्तर, बघा काय म्हणाल्या..
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि एकच खळबळ उडाली. यानंतर कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेण्यासाठी आग्रह केला तर काही ठिकाणी आंदोलनही झाले. या सर्वांच्या आग्रहाखातर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. दरम्यान, यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना म्हटले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रूपाली पाटील म्हणाल्या, ‘चंद्रशेखर बावनकुळे हे तमाशाला जात असावेत. ज्यांना कावीळ झाली असते त्यांना सर्व पिवळं दिसतं.’, असे म्हणत खोचक निशाणा साधला. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी तमाशाला कमी जावं. भाजपचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, महत्त्वाच्या पदावर असलेल्या लोकांची कामंच ती आहेत, तमाशा पाहायला, लोकांची घरं फोडायची. जागे व्हा राज्याची धुरा तुमच्या हातात आहे. राज्याची कामं करा, असे देखील म्हणत रूपाली पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.