भविष्यात शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. येत्या काही काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य करत शरद पवार यांनी काही गौप्यस्फोटही केलेत.
येत्या काही काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. तर काँग्रेस आणि आमच्यात कोणताही फरक नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरूंच्या विचारसणीचे आहोत. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास उद्धव ठाकरे हे देखील सकारात्मक असल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी या मुलाखतीत केला. पुढे शरद पवार यांनी असेही म्हटले की, उद्धव ठाकरे यांची विचारसरणी आमच्यासारखीच आहे. परिस्थिती १९७७ मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षसारखी होऊ शकते. १९७७ मध्ये विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मोरारजी देसाईंची नंतर पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. असे असले तरी आज मोरारजी देसाईंपेक्षा राहुल गांधींना जास्त पाठिंबा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.