गुप्त भेटीत अजित पवार यांचा शरद पवार यांना प्रस्ताव, काका-पुतण्यांमध्ये नेमकी कशी झाली बैठक?

गुप्त भेटीत अजित पवार यांचा शरद पवार यांना प्रस्ताव, काका-पुतण्यांमध्ये नेमकी कशी झाली बैठक?

| Updated on: Aug 12, 2023 | 9:16 PM

VIDEO | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुप्त बैठक, पुन्हा अजित दादा यांचा शरद पवार यांच्यापुढे जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने प्रस्ताव सादर केला, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, १२ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यातील कोरेगाव पार्क येथे गुप्त बैठक झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या दोघांच्या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पुढे प्रस्ताव सादर केला. व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या घरी ही बैठक पार पडली. चोरडिया यांच्या घरातून आधी शरद पवार बाहेर पडले. नंतर अजित पवार…या दोघांमध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवार निघून गेले. शरद पवार टिव्ही ९ मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र अजित पवार यांनी माध्यमांना चकवा देत ते सूसाट निघून गेले. या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापुढे प्रस्ताव सादर केला. अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यात गुप्त भेट झाली. सत्तेत सोबत या, असा अजित दादा यांनी जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने हा प्रस्ताव मांडला. अजित पवार शरद पवार यांची गुप्त भेट नेमकी कशी आणि कुठं झाली बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Aug 12, 2023 09:14 PM