शरद पवार आपली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत केला मोठा धमाका

शरद पवार आपली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत केला मोठा धमाका

| Updated on: May 09, 2024 | 10:41 AM

येत्या काही काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केले. एका इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत धमाका केला.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवारांनी विलनीकरणावरून भाष्य केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारसरणीत फरक नाही. तर सहकाऱ्यांना विचारून अंतिम निर्णय घेणार, असं शरद पवार म्हणाले. बारामतीचं मतदान संपताच शरद पवारांनी मोठं मतदान केलं. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे संकेत दिलेत. एका इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत धमाका केला. या मुलाखतीत शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा सवाल केला असता शरद पवार म्हणाले, पुढील २ वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील. किंवा स्वतःच्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीन होणं हे चागलं आहे. असं त्यांना वाटलं. तर ते त्या पर्यायाकडे पाहतील. तर मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरत दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. मी आता काही सांगू शकत नाही, असे शरद पवार म्हणाले.

Published on: May 09, 2024 10:40 AM