Karnataka Election Results 2023 : कर्नाटक निकालानंतर शरद पवार यांचं पहिलं भाष्य, म्हणाले...

Karnataka Election Results 2023 : कर्नाटक निकालानंतर शरद पवार यांचं पहिलं भाष्य, म्हणाले…

| Updated on: May 13, 2023 | 3:51 PM

VIDEO | भाजपच्या धार्मिक राजकारणावर शरद पवार म्हणाले, धर्म आणि जातीचं राजकारण...

मुंबई : कर्नाटकातील निवडणूक (Karnataka Election Results 2023) नुकतीच पार पडली आणि आज या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. दरम्यान, कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शरद पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पवार म्हणाले, कर्नाटकातील लोकांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला धडा शिकवला. तसेच धार्मिक आणि जातीय राजकारणालाही नाकारलं आहे. कर्नाटक निवडणुकीच्या माध्यमाने काँग्रेसच्या हाती जनतेने सत्ता दिली आहे, हे स्पष्ट झाले आहे. तर केरळ, कर्नाटक, तेलंगना, आंध्र, राजस्थान, दिल्ली, झारखंड आणि पंजाबमध्ये भाजपचं सरकार नाही. यासह पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये नाही. बहुसंख्य राज्यात भाजप सत्तेच्या बाहेर जाणारा आहे. तर 2024 मध्ये ज्या निवडणुका होतील. त्या निवडणुकीमध्ये काय अंदाज असेल हे या निकालातून स्पष्ट होत आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट करत ही निवडणूक लोकसभेची नांदी असल्याचे संकेत दिले आहेत.

Published on: May 13, 2023 03:51 PM